
पाटणा: चांद्रायण-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता राजकारण सुरु झाले आहे. काँग्रेसने ट्विट करत इस्त्रोची स्थापना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी केली होती. असे म्हणत मोदी सरकारला टोला लगावला आहे. यावर गिरीराज सिंह यांननी काँग्रेसच्या खोचक टिकेला केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी प्रत्यत्तर दिले आहे. ते म्हणाले, चंद्राचा शोध देखील काँग्रेसने लावला आहे. याची आठवण देशाला करून देण्याची हीच योग्य वेळ असल्याचा चिमटा सिंह यांनी आपल्या ट्विटमधून काढला आहे. मात्र नंतर काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीट केले आहे.
ही बातमी पण वाचा : चंद्रपूरला ४ ऑगस्ट रोजी ‘मिशन शक्ती’चे उद्घाटन – सुधीर मुनगंटीवार
चंद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर काँग्रेसने पंडित जवाहरलाल नेहरूंचा शास्त्रज्ञांसोबतचा एक फोटोही ट्विट केला आहे. नेहरूंच्या दूरदृष्टिचे स्मरण करण्यासाठी आजचा दिवस सुयोग्य आहे. नेहरूंनी 1962 मध्ये INCOSPARच्या स्थापनेच्या माध्यमातून अवकाश संशोधनाची सुरुवात केली. त्यानंतर ही संस्था इस्त्रो म्हणून नावारूपास आली, असे ट्विट करत काँग्रेसने मोदी सरकारला टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे चंद्रयान-2 या मोहिमेला 2008 मघ्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी मान्यता दिली होती. या गोष्टीचा स्मरण करण्याऐवजी आजचा दिवस अतिशय योग्य असल्याचे काँग्रेसने म्हटले ट्विटमध्ये म्हटले आहे.
ही बातमी पण वाचा : अखेर ‘चांद्रयान २ ‘ अवकाशात झेपावले