मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे

Mansukh Hiren death case has been transferred to NIA

मुंबई :- उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटकं मिळालेल्या गाडीच्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला आहे. सोमवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने हा तपास एनआयएला देण्याबाबतचे आदेश जारी केले.

एटीएसने मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी (Mansukh Hiren) हत्येचा गुन्हा दाखल केला होता. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी याबाबत सोमवारी विधिमंडळात निवेदन दिलं होतं. एटीएसने मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा प्रथमदर्शनी संशय व्यक्त केला होता.

हा तपास NIA ने राज्याकडून परस्परच काढून घेतल्यानंतर येत्या काळात पुन्हा राज्य विरुद्ध केंद्र असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER