जळगावातील महिला वसतिगृहातील प्रकाराची कसून चौकशी करा, रक्षा खडसे आक्रमक

Raksha Khadse

जळगाव : जळगावातील शासकीय वसतिगृहात पोलिसांनी तरुणी, महिलांना निर्वस्त्र करून नाचण्यास भाग पाडल्याचा मनाला लाजवणारा आणि तितकाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जळगावातील या भयंकर प्रकरणानंतर भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनीसुद्धा आक्रमक भूमिका घेत चौकशीची मागणी केली आहे.

जळगाव आशादीप वसतिगृह या ठिकाणी ज्या प्रकारे महिलांवर अत्याचारझाल्याचे प्रकार उघड झाले, अशा प्रकारे अनेक वेळा अत्याचाराचे प्रकार त्या ठिकाणी महिलांबरोबर झालेले आहेत. अशा तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्यामुळे याची कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी केली. जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे या कृत्याचा व्हिडीओही सादर केला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER