वाझे आणि नालेसफाई कंत्राटदाराच्या कनेक्शनची सखोल चौकशी करा, शेलारांची मागणी

Sachin waze-Ashish Shelar

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकणात (Mansukh Hiren’s death case) अडकलेले निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेवर (Sachin waze) नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदारांकडून पैसे वसूल करण्याचे काम देण्यात आले होते. त्यामुळे वाझे आणि नालेसफाईच्या कामाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ही मागणी केली. सचिन वाझेला पालिकेच्या कंत्राटदारांकडून वसुली करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, अशी माहिती कोर्टाच्या रेकॉर्डवर नमूद आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामाची आणि वाझेच्या कनेक्शनची चौकशी केली जावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

मुंबई महापालिकेकडून मान्सूनपूर्व तयारी पूर्णपणे झालेली नाही. नालेसफाईचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा सपशेल खोटा आहे. नालेसफाई करून दाखवण्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेला या जबाबदारीतून हात झटकता येणार नाही. ७० कोटी रुपये नालेसफाईसाठी खर्च केलेल्या महापालिकेला त्याचा हिशोब द्यावा लागेल, असं सांगतानाच शिवसेनेनं नाल्यावर शेती करण्याची नवीन योजना सुरू केल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान यापूर्वी शेलार यांनी नालेसफाईवरून पालिकेवर टीका केली होती. ७० कोटी खर्च करुन केलेली नालेसफाई संपूर्ण आभासी आहे. विषय दाव्याचा नाही तर आश्वासनाचा आहे. मुंबईकरांना महापालिकेने शब्द दिला होता, मुंबईची तुंबई होऊ देणार देणार नाही. आता खोत बोलून पळ काढू नका. ५ लाख मॅट्रिक टन गाळ काढला म्हणता, मिठी नदीचा जरी गाळ पकडला तरी तो टाकला कुठे? असा प्रश्न त्यांनी केला होता. ते सरकारी डम्पिंग ग्राऊंड असेल तर गाळ टाकल्याचा फोटो दाखवा, खासगी असेल तर सीसीटीव्ही दाखवा, गाळ कुठे मोजला त्या वजन काट्याच्या पावत्या दाखवा, असं आव्हान देतानाच नालेसफाईत सुद्धा कमिशन सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button