अर्णब गोस्वामी ‘चॅट’प्रकरणाची चौकशी करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Arnab Goswami - Prithviraj Chavan

मुंबई : रिपब्लिक भारत टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील संवेदनशील व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) संवाद शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली होती. याची चौकशी करा, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. गोस्वामींना ही संवेदनशील माहिती कोणी पुरवली असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

ट्विटद्वारे या प्रकरणावर शंका व्यक्त करताना चव्हाण म्हणाले, मुंबई पोलिसांनी रिलीज केलेले गोस्वामी यांचे व्हॉट्सअॅप चॅट्स हे खूपच धक्कादायक आहेत. देशाच्या सुरक्षेबाबतची संवेदनशील माहिती, घटना दुरुस्त्या आणि राजकीय नियुक्त्यांबाबतची माहिती त्यांना कोणी पुरवली?

भारत सरकारने याप्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली पाहिजे आणि संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीने हे प्रकरण प्राधान्याने आपल्याकडे घ्यावे अशी मागणीनीह पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली आहे.

अर्णब गोस्वामी- दासगुप्ता यांच्यातील संवाद

अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) आणि पार्थ दासगुप्ता यांच्या संवादात पार्थ यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा उल्लेख निष्क्रिय (यूजलेस) असा केला आहे. त्याचबरोबर समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या संवादांत सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, असा दिलासा गोस्वामी यांनी पार्थ यांना दिलासा दिल्याचे उघड झाले आहे. याशिवाय फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे अतिरेक्यांनी घडवलेल्या आत्मघातकी हल्ल्याबाबत अर्णब यांचे आक्षेपार्ह विधान आढळते. या हल्ल्यात ४० केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाले होते. या व्हॉट्सअ‍ॅप संवादात पुलवामा हल्ल्याबाबत अर्णब यांनी केलेल्या विधानाचा समाचार नागरिकांनी ट्विटरसह अन्य समाजमाध्यमांवरून घेतला. समाजमाध्यमांवर शुक्रवारी याच संवादांबाबत चर्चा होती. मीम्स आणि टीकेचा भडीमार होत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER