देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशी करा, दोन याचिका

Maharashtra Today

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेले आरोप आणि संबंधित संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी रकर, या मागणीसाठी आणखी दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात (Investigate the allegations against Deshmukh) करण्यात आल्या आहेत.

परमबीर यांनीही देशमुख यांच्यावरील आरोपांच्या आणि त्यांच्या कारभाराच्या सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी गुरुवारी फौजदारी जनहित याचिका केली होती. वकील घन:श्याम उपाध्याय आणि पुणेस्थित सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी या याचिका दाखल केल्या आहेत. देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला या दोघांनी याचिकेत दिला आहे.

उपाध्याय यांनी आपल्या याचिकेत परमबीर यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सखोल चौकशीचे आदेश देण्याची मागणी केली आहे. पोलीस आणि राजकीय नेत्यांंकडून खंडणी मागितली जात असल्याच्या आरोपांची, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवण्यापासून ते परमबीर यांनी देशमुख यांच्यावर आरोप करण्यापर्यंतच्या सगळ्या घटनाक्रमाची सीबीआय किवा इतर स्वतंत्र तपास यंत्रणेतर्फे चौकशी करावी, अशीही मागणी केली आहे.

वादग्रस्त निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी केलेल्या कथित गुन्ह्यांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी देशमुख, परमबीर यांच्यावर कारवाईच्या आदेशाची मागणी पाटील यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER