फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंगप्रकरणाची चौकशी करून कारवाई करा : नाना पटोले

Devendra Fadnavis - Nana Patole

मुंबई :- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात २०१६-१७ साली फोन टॅपिंग करण्यात आले होते.  त्यात माझाही फोन टॅप करण्यात आला होता. अशी माहिती एका खासगी टीव्ही चॅनेलकडून मिळाली आहे, असा आरोप काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. यात अमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले, असे पटोलेंनी सांगितले.

फोन टॅपिंगप्रकरणी नंबर माझा आणि ‘अमजद खान’ असे खोटे नाव वापरण्यात आले होते. या संबंधित सर्वांची आघाडी सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), भाजप (BJP) तसेच शिवसेनेतील (Shiv Sena) काही महत्त्वाचे नेते आणि काही आयएएस, आयपीएस अधिकारी यांचेही फोन टॅपिंग केले जात होते. माझा संबंध अमलीपदार्थांच्या तस्करीशी जोडण्याचा प्रयत्न करून हा निंदनीय आणि अश्लाघ्य  प्रकार करण्यात आला.”

फोन टॅप करण्याची परवानगी कोणी दिली?
फोन टॅपिंग करताना बनावट नावे आणि खोटे पत्ते दाखवून फोन टॅप करण्यात आले. फोन टॅपिंग करण्याची परवानगी कोणी दिली आणि यामागचा उद्देश काय होता? फोन टॅप करून एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवणे हा गुन्हा आहे. तसेच हा प्रकार व्यक्तिस्वातंत्र्याचा भंग करणारा आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार हे खपवून घेणार नाही. जे कोणी या फोन टॅपिंगशी संबंधित होते, त्यांची चौकशी करून कारवाई करावी, असे नाना पटोले यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : राज्यांनी ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणे थांबवले पाहिजे; फडणवीसांची चेतावणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button