रोजगार नसतानाही डबेवाल्यांकडून मानवतेचा परिचय; रुग्णालयाबाहेर जेवणाचे वाटप

Mumbai Dabbawala

मुंबई : राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहे. मात्र याचा फटका ज्याप्रमाणे रोजंदारी कामगारांना बसला तसाच तो मुंबईच्या डबेवाल्यांनाही बसला आहे. मुंबईच्या डबेवाल्यांचा लॉकडाऊन काळात रोजगार बुडाला असला तरी मानवतेचा परिचय देत त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मुंबईतील केईएम रुग्णालयाबाहेर गरजूंना जेवण वाटपाचं काम मुंबईच्या डबेवाल्यांनी केलं आहे. केईएम रुग्णालयात कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणासाठी वणवण भटकावे लागत होते. अनेकदा नातेवाइकांना उपाशी राहावं लागतं. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या डबेवाल्यांनी मुंबईतील तीन ते चार ठिकाणी जेवणाचं वाटप करून रुग्णांच्या नातेवाइकांना मदत केली आहे. ‘हा उपक्रम राबवण्यासाठी आम्ही वैयक्तिक पातळीवर निधी जमा करून आणि आमच्या ट्रस्टच्या मदतीतून मुंबईतील तीन ते चार ठिकाणी मोफत जेवण देण्याचं ठरवलं आहे.’ अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते विष्णू काळडोके यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button