माझ्या भाषणात अडथळे आणणे हा पूर्वनियोजित कट, कारण…; मोदींचा आरोप

Narendra Modi

दिल्ली : राष्ट्रपतींच्या भाषणाला उत्तर देताना लोकसभेत पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) शेतकरी आंदोनलच्या मुद्द्यावर बोलत असताना विरोधकांनी गोंधळ सुरू केला. यावर मोदी यांनी विरोधकांवर आरोप केला की, आंदोलन करणारे शेतकरी अफवांना बळी पडले आहेत. कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांना खरी माहिती कळू नये म्हणून माझ्या भाषणात अडथळे आणले जात आहेत. हा सुनियोजित कट आहे.

मोदी म्हणालेत, शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत सरकारला आदर आहे. त्याचा आदर करत राहू. पंजाबमध्ये आंदोलन सुरू असल्यापासून सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करते आहे.

अध्यादेश काढून कृषी कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर संसदेनं या कायद्यांना मंजूरी दिली. हे कायदे लागू केल्यानंतर एकही बाजार समिती बंद झाली नाही. एमएसपी बंद झाली नाही. हे सत्य आहे, जे लपवलं जाते आहे. उलट हे कायदे आणल्यापासून एमएसपीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांसोबत अनेक बैठका झाल्या. कृषी कायद्यांवर भरपूर चर्चा झाली. शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हाच सरकारचा हेतू आहे,असा दावा मोदी यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER