…तर फडणवीस यांचीही चौकशी करा; नाना पटोलेंची मागणी

मुंबई :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील कलगीतुरा थांबेना. फडणवीस हे धडधडीत खोटे बोलत आहेत. विधानसभेत त्यांनी सीडीआरबाबत खोटी माहिती दिली. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून ते महाराष्ट्राविरोधात कूट रचत आहेत. वेळ आल्यावर सरकारने फडणवीस यांचीही चौकशी करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी फडणवीस यांच्यावर चौकशी करण्याची मागणी केली. महाराष्ट्रील सत्ता गेल्यापासून भाजपाचे नेते सैरभैर झाले आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम भाजपा करत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. भाजपाच्या या कृतीला लोक कंटाळले आहेत. देवेंद्र फडणवीस हे बेछूट, बेलगाम आणि बालीश आरोप करत आहेत, अशी टीका पटोलेंनी केली. दरम्यान, “रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करण्याचे अधिकार होते का? याची चौकशी केली जाणार आहे. काही अधिकारी केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, रश्मी शुक्लांनी कोणाच्या हातचे बाहुले बनू नये. त्यांनी जनतेची कामे केली पाहिजेत.” असे पटोले म्हणाले.

नाना पटोलेंची स्पष्टोती

“सरकार येतात जातात पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. अभिनेता सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणातही भाजपाने केंद्रीय तपास यंत्रणांना व माध्यमांना हाताशी धरून चार महिने महाराष्ट्राला बदनाम केले. महाराष्ट्र ‘खुनी’ राज्य असल्याचे चित्र निर्माण केले गेले. आताही केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून फडणवीस तेच करत आहेत. ते मुख्यमंत्री असताना न्यायाधीश असल्यासारखे सर्वांना क्लिन चिट देत सुटले होते. फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होते, त्यावेळी त्यांनी राजीनामे दिले होते का? नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावरही आरोप आहेत, त्यांनी राजीनामा दिला का? मग अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा राजीनामा मागण्याचा त्यांना काय अधिकार? सध्याच्या प्रकरणात जे दोषी आढतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल, चुकीला माफी नाही.” असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

सरकार बॅकफूटवर नाही

परमबीर सिंग, रश्मी शुक्लाप्रकरणी सरकारच्या घटक पक्षात कोणतेही मतभेद नाहीत आणि सरकार बॅकफुटवरही नाही. काही लोक जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी अफवा पसरवतात. राज्यपाल कोश्यारी यांना भेटण्याची वेळ मागितली आहे. त्यांची वेळ मिळताच महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : संजय राऊत पवारांचे प्रवक्ते आहे का? यूपीएबाबत त्यांना बोलण्याचा अधिकार नाही – नाना पटोले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER