जगभरात इंटरनेट ठप्प! अमेझॉनसह दिग्गज कंपन्यांच्या वेबसाइट्स बंद

Internet jams around the world - Maharashtra Today

वॉशिंग्टन :- जगभरात काही वेळापूर्वी इंटरनेट ठप्प झाले. मोठमोठ्या कंपन्यांच्या वेबसाईट्स क्रॅश झाल्यात. वेबसाईट्स क्रॅश होणाऱ्यांमध्ये Reddit, Spotify, Twitch, Stack Overflow, GitHub, gov.uk द गार्जियन, न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी, फायनान्शियल टाइम्स अशा अनेक लोकप्रिय वेबसाईट्सचा समावेश आहे. एका महत्त्वाच्या इंटरनेट इंफ्रास्ट्रक्चर सर्व्हिस प्रोव्हायडरमुळे इंटरनेट ठप्प झाल्याचे कळते.

जागतिक माध्यम संस्था न्यूयॉर्क टाइम्स आणि ब्रिटन सरकारची वेबसाईटदेखील क्रॅश झाली आहे. या वेबसाईट्स लोडच होत नाहीत. युजर्सला वेबसाईटवर एरर दिसतो आहे. क्लाऊड कम्प्यूटिंग कंपनी Fastly मुळे हा गोंधळ झाल्याचे सांगितले जाते. ही कंपनी वेबसाईट्सला सर्व्हिस देते. वेबसाईटवर क्लिक केल्यावर ‘एरर कोड ५०३ (error 503) दिसतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button