
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय चहा दिवस: संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन) २१ मे रोजी भारताच्या शिफारशीनुसार आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून घोषित केले आहे, तथापि हा दिवस दर वर्षी १५ डिसेंबरला साजरा केला जातो. मिलान येथे ४ वर्षांपूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय अन्न व कृषी संघटनेच्या (एफएओ) इंटरगव्हर्नल ग्रुपच्या बैठकीत भारताने हा प्रस्ताव ठेवला होता.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने चहाचे औषधी गुण तसेच सांस्कृतिक महत्त्व देखील जाणून घेतले आहे. आंतरराष्ट्रीय चहा दिवस १५ डिसेंबर २००५ रोजी नवी दिल्ली येथे सुरू झाला, परंतु एका वर्षानंतर हा श्रीलंकेत साजरा करण्यात आला आणि तेथून जगापर्यंत पसरला.
ही बातमी पण वाचा:- रमजान ईद दरवर्षी 11 दिवसांनी मागे जाते ; मुस्लीम चांद्र कॅलेंडरने सांगितले कारण
संयुक्त राष्ट्र संघाने आता भारताच्या सूचनेनुसार २१ मेला आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून घोषित केले आहे. गुणवत्तापूर्ण चहा उत्पादनाचा हंगाम मेमध्ये केवळ चहा उत्पादक देशांमध्येच सुरू होतो. यूएनच्या म्हणण्यानुसार २१ मेला आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून घोषित केल्यास त्याचे उत्पादन व विक्री वाढण्यास मदत होईल. यामुळे ग्रामीण भागातील उपासमार आणि दारिद्र्य विरूद्ध लढायला मदत होईल असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.
चहा उत्पादक आणि चहा कामगारांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणे हा आंतरराष्ट्रीय चहा दिनाचा उद्देश आहे. चहा उत्पादक देश बराच नफा कमावतात. मात्र चहा बागेत काम करणाऱ्या मजुरांची अवस्था अत्यंत वाईट आहे. म्हणूनच चहा कामगार, कामगार हक्क, रोजंदारी, सामाजिक सुरक्षा, रोजगाराची सुरक्षा आणि आरोग्याचा दर्जा वाढविणे हा आंतरराष्ट्रीय चहा दिनाचा उद्देश आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला