१५ वर्षांचे असाल तरच खेळता येईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट

ICC

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) खेळाडूंच्या हितासाठी वयोमर्यादेचे बंधन निश्चित केले आहे. त्यानुसार आता कोणताही खेळाडू १५ वर्षांवर वय असेल तरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट (International Cricket) खेळू शकणार आहे. त्यापेक्षा कमी वयाच्या खेळाडूंना परवानगी नसेल. हा नियम पुरुष, महिला व १९ वर्षांआतील वयोगटाच्या स्पर्धांना लागू होणार आहे.

आयसीसीच्या सर्व स्पर्धा, द्विपक्षीय मालिका आणि १९ वर्षांआतील गटाच्या स्पर्धांसाठी हे बंधन घालून देण्यात आले आहे. अपवादात्मक परिस्थितीत संबंधित मंडळाने आयसीसीकडे १५ वर्षांआतील खेळाडूला खेळू देण्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास तो खेळाडू मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का, हे बघूनच ही परवानगी मिळू शकणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER