कुलभूषण जाधवांच्या शिक्षेवर आज फैसला

Kulbhushan Jadhav

नवी दिल्ली : हेरगिरी व दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालय आज खटल्याचा निकाल देणार आहे.

या सुनावणीसाठी पाकिस्तानची कायदेविषयक टीम हेग येथे दाखल झालेली आहे. पाकिस्तानी मीडियानुसार पाकच्या कायदेविषयक टीमचे नेतृत्व ज्येष्ठ वकील मंसूर खान करत आहेत. त्याचसोबत टीमसोबत पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहम्मद फैसलदेखील उपस्थित आहेत. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेला पाकिस्तानकडून विरोध केला जाणार आहे. हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुलक्वी अहमद युसूफ या खटल्याचा निकाल देणार आहेत.

कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करण्याचा आदेश पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने द्यावा म्हणून तिथे भारताने दाद मागितली होती. जाधव यांना भारतीय राजदूतावासाशी संपर्क करू न देणे, खोट्या पुराव्यांवर खटला चालवून फाशीची शिक्षा सुनावणे अशी कृत्ये करून पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचा भंग केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कोर्टाकडून कुलभूषण जाधव प्रकरणात काय निकाल येतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

ही बातमी पण वाचा : देशातील घुसखोरांना बाहेर काढू : अमित शहा