विधानपरिषदेच्या इच्छुक उमेदवारांनी ५ ऑक्टोबरपर्यंत टिळक भवन येथे अर्ज पाठवावेत

Vidhan Bhavan

मुंबई : विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील रिक्त जागांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी ५ ऑक्टोबरपर्यंत आपले उमेदवारी अर्ज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे ई-मेलद्वारे पाठवावेत, असे आवाहन प्रदेश काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

विधानपरिषदेच्या आगामी काळात रिक्त होणा-या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. अर्जाचा नमुना टिळक भवन येथे उपलब्ध आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ५ ऑक्टोबर २०२० पर्यंत [email protected], [email protected] या ई-मेलवर पाठवावेत. यासंदर्भात काही अडचण आल्यास कार्यालय अधीक्षक नामदेव चव्हाण, मो. क्र. 9820126629 यांच्याशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER