14 वित्त आयोगातील गावांमधील शिल्लक रकमेच्या व्याजावर ग्रामविकास खात्याचा डल्ला

Chandrakant Patil

कोल्हापूर : नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी 100% 14 वा वित्त आयोग थेट ग्रामपंचायतींना दिला आणि त्यांनी स्वायत्तता वाढवली. जी कामे गावाच्या विकासासाठी करणे अपेक्षित होते ती करून उरलेली रक्कम ग्रामपंचायतींनी मुदत ठेव मध्ये ठेवली त्यावरचे व्याज कोरोना मध्ये नागरिकांना होमिओपॅथीच्या गोळ्या वाटण्यासाठी ग्रामविकास खात्याला द्यावे असा जीआर ही नाही असे पत्रक सरकारने काढले आणि त्या-त्या जिल्ह्यांमध्ये मुख्याधिकारी हे सक्तीने वसूल करीत आहेत. ग्रामपंचायतींच्या विकासासाठी केंद्राचे हे व्यजाचे पैसे राज्यसरकारने तातडीने परत करावेत अन्यथा भाजपाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिला.

आजच केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांना ही बाब निदर्शनास आणण्यासाठी पत्र लिहित असल्याचे सांगून आ. पाटील म्हणाले, 2014 ते 2019 14 व्या वित्त आयोगाच्या अनुभवावरून अहवाल सादर करताना( 4 डिसेंबर 2019) माननीय राष्ट्रपतींना आपल्या देशाची रचना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशी असल्यामुळे शंभर पैकी 80 रुपये ग्रामपंचायत, दहा रुपये पंचायत समिती व दहा रुपये जिल्हा परिषदेला द्यावेत अशी सूचना नवीन वित्त आयोगाने केली. 31 जानेवारी 2020 हा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला व 80 -10-10 हे सूत्र मान्य केले.

यात मा.ना. हसन मुश्रीफ यांचे श्रेय काय ? व त्यांचा सत्कार कशासाठी ? दरवर्षी 15 टक्के सरकारी बदल्या 31 मे पूर्वी करावयाच्या असतात कोरोना स्थितीमुळे राज्य शासनाने 04 /05/2020 मध्ये यावर्षी बदल्या नाहीत असा निर्णय केला आणि सात जुलै 2020 मध्ये बदलला.

या कोरोनास्थितीत नवीन ठिकाणी सरकारी नोकर, त्याचे कुटुंबीय कोरोना भितीने जातील ? प्रत्यक्ष नाही पण त्यांच्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले त्यांनी आता नवीन ठिकाणी प्रवेश घ्यावा ? आणि गेल्या चार महिन्यात कोरोना संबंधी त्यांच्याकडे असणाऱ्या कामात त्यांनी पकड घेतली आहे या स्थितीत त्या ठिकाणी नवीन माणूस आणायचा ? हे सर्व अनाकलनीय आहे.

ना.मुश्रिफ यांनी ना देवेंद्र फडणवीसांचे डोळे पांढरे होतील, कोरोनातील सरकारच्या कामामुळे असे म्हणाले. हो पांढरे होतील, तुमच्या कोरोना काळातील भ्रष्टाचारामुळे, मृतदेहाच्या बॅगमध्ये भ्रष्टाचार, तात्पुरती कोविड सेंटर मध्ये भ्रष्टाचार, रुग्णांना जेवण पुरवणे यामध्ये भ्रष्टाचार, मास्क मध्ये भ्रष्टाचार इत्यादी इत्यादी.

या सर्व विषयांमध्ये महाविकास आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही विधानसभा अधिवेशनची वाट बघत असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हंटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER