इंटर-पार्लामेंटरी अलायंस ऑन चायना; चीनविरुद्ध अमेरिकेसह ८ देशांची आघाडी

Donald Trump - Xi Jinping

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरस, दक्षिण चीन महासागर आणि हाँगकाँगसारख्या वादग्रस्त प्रकरणावरून चीनवर अनेक देश टीका करत आहेत. लडाखजवळ असलेल्या भारत चीन या सीमेवरही चीनच्या कुरापती सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेसहा ८ देशांनी – चीनची उपस्थिती जागतिक व्यापार, संरक्षण आणि मानवाधिकारांसाठी धोकादायक असल्याची घोषणा करत इंटर-पार्लामेंटरी अलायंस ऑन चायना (IPAC) या संघटनेची स्थापना स्थापना केली.

शुक्रवारी ब्लूमबर्गच्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली. आयपीएसी मध्ये अमेरिका, जर्मनी, ब्रिटेन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्वीडन, नॉर्वे आणि यूरोपच्या संसदेचे सदस्य आहेत. चीनवर टीका करणारे आणि अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टीचे सिनेटर मार्को रुबियो इंटर-पार्लामेंटरी अलायंस ऑन चायनाचे सह-अध्यक्ष आहेत.

कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीत चीन जागतिक आव्हान उभे करतो आहे असा आरोप रुबिओ यांनी कला. चीनचा विरोध करणाऱ्या देशाला कायम एकटे असल्याची मोठी किंमतही मोजावी लागते, असे इंटर-पार्लामेंटरी अलायंस ऑन चायनाने म्हटले आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसारानंतर चीन आणि अमेरिकेतील तणाव सतत वाढतो आहे. त्याचा परिणाम व्यापार आणि पर्यटनाच्या संबंधांवरही पडू लागला आहे, हे उल्लेखनीय.

चीनचा जळफळाट
आयपीएसीच्या स्थापनेबाबत संताप व्यक्त करताना चीनने म्हटले आहे की – हा १९०० च्या दशकातील ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, रशिया, जपान, इटली आणि ऑस्ट्रिया-हंगेरी या ८ देशांच्या आघाडीसारखा प्रकार आहे. चीनच्या ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे की, या देशांच्या सैन्यानं पेईचिंग आणि अन्य शहरांमध्ये लूटमार केली होती आणि साम्राज्यवादाविरोधात यिहेतुआन आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला होता.

आजचा चीन हा १९०० च्या दशकातील चीन नाही. तो स्वतःच्या हितांचे रक्षण करू शकतो, असे पेईचिंगमधील चाइन फॉरेन अफेअर्स विद्यापीठातील तज्ज्ञ ली हाएडॉन्ग यांनी म्हटले आहे. अमेरिका इतर देशांना चीन विरोधी विचारसरणीत सामावून घेत आणि पश्चिमेकडील क्षेत्रात चीनविरोधात वातावरण तयार करून स्वत:चा फायदा करून घेऊ इच्छितो, असा आरोप त्यांनी केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER