नितेश राणेंकडून मोठी घोषणा ; मतदारसंघातील सर्व सरपंचांना विमाकवच

Nitesh Rane

मुंबई :- राज्यात सुरु असलेल्या कोरोना संकटाच्या (Corona Crises) पार्श्वभूमीवर सरपंच मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. ही जबाबदारी पार पाडत असताना अनेक सरपंचांचा मृत्यूही झाला. यापार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मोठी घोषणा केली आहे . कणकवली-देवगड- वैभववाडी मतदारसंघातील सर्व सरपंचांना प्रत्येकी 3 लाखांचा आरोग्य विमा आणि 7 लाख 50 हजारांपर्यंतचा मोबदला मिळेल, असे विमा कवच दिले जाणार आहे

ज्या मतदारांनी मला निवडून दिलंय. त्या सर्वांचं मी प्रतिनिधित्व करतोय. त्यामुळे मतदारसंघातील सर्व सरपंचाचा विमा उतरवून त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी माझी आहे. येत्या चार दिवसांत सर्व सरपंचाचे विमा उतरण्याची प्रक्रिया देशातील चोला मंडलम या प्रसिद्ध इन्शुरन्स कंपनीकडून पूर्ण केली जाईल, अशी माहितीही राणे यांनी दिली .

एक वर्षासाठी असणाऱ्या या विम्याला तीन लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे, त्याचबरोबर ज्या सरपंचांचा 3 लाखांचा खर्च झाला असेल तर त्यांना आणखी 75 हजार रुपये वाढवून मिळणार आहेत. तसेच रुग्ण वाहिकेपासून व्हीआयपी उपचारपद्धती यात लागू होणार आहे. कोरोनाबरोबरच इतर आजारही या विमा कवचमध्ये समाविष्ट केलेत. एकूण सात ते साडेसात लाख रुपयांचा खर्च ही कंपनी या विम्यात करणार आहे, असेही राणे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ठाकरे सरकार निर्लज्ज, नुकसानग्रस्त कोकणवासीयांना वाऱ्यावर सोडले – नितेश राणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button