पतसंस्थेमधील ठेवीला आता विमा संरक्षण

Maharastra Rajya Sahakari Patsanstha Federation

मुंबई : राज्यातील नागरी सहकारी, महिला सहकारी, ग्रामीण बिगरशेती पतसंस्थांची संख्या 16 हजारांवर पतसंस्थांमध्ये 1 लाख कोटींपेक्षा जास्त ठेवी आहेत. या ठेवींना संरक्षण देण्याची योजना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने तयार केली आहे. 50 हजार रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत ठेवींना विमा संरक्षण मिळणार आहे.

पतसंस्था फेडरेशनच्या राज्यातील प्रमुख पतसंस्था पदाधिकाऱ्यांची बैठक शिर्डी येथे नुकतीच झाली. त्यामध्ये ही घोषणा केली आहे. या बैठकीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, पतसंस्था फेडरेशनचे संचालक व सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी, बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे चेअरमन राधेश्याम चांडक, शांतीलाल सिंगी, दादाराव तुपकर, सुदर्शन भालेराव आदी उपस्थित होते.

पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देताना इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी या संस्थेची परवानगी मिळविण्यापूर्वी विमा हा शब्द वापरता येणार नाही. तरीदेखील नावात विमा शब्द नसला तरी तत्सम संरक्षण पतसंस्थांच्या ठेवींना आता उपलब्ध होणार असल्याने ठेवीदारांनी पतसंस्थांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी, असे आवाहनही पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले यानिमित्ताने केले आहे.

राज्यातील सहकारी पतसंस्थांना अडीअडचणीचे प्रसंगी अधिकाधिक निधी प्राप्त होण्यासाठी अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीच्या धर्तीवर स्टॅबिलायझेशन फंड या संस्थेची सहकारी तत्त्वावर स्थापना करण्याचा निर्णय या प्राथमिक बैठकीत घेण्यात आला. अशा प्रकारची संस्था स्थापन होण्यासाठी स्थिरीकरण निधी (स्टॅबिलायझेशन फंड) म्हणून 106 कोटी रुपये देण्याची घोषणा राज्यात विविध पतसंस्थांनी केली. तरलता आधारित संरक्षण निधी तथा लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंड ही संकल्पनाही याच संस्थेद्वारे राबविण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER