‘त्यांच्याकडून बाळासाहेबांचा अवमान’, तृप्ती सावंतांच्या भाजप प्रवेशावर महाडेश्वर कडाडले

vishwanath mahadeshwar - BJp - Maharastra Today

मुंबई : काळ शिवसेनेला (Shivsena) मातोश्रीच्या अंगणात मोठा धक्का बसला. वांद्रे पूर्व या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या मतदारसंघातील शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी काल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशावर शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे. तृप्ती सावंत यांनी भाजपसारख्या बेगडी हिंदुत्व असलेल्या पक्षाचा आधार घेतला. त्यांनी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा अवमान केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे.

महाडेश्वरांना शिवसेनेने वांद्रे पूर्व मतदारसंघातून तिकीट दिल्यानेच तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर सावंतांची पक्षातून हकालपट्टी झाली, तर बंडखोरीचा फटका बसल्याने महाडेश्वर यांना पराभव पत्करावा लागला होता. बाळा सावंत हे मातोश्रीच्या जवळचे निष्ठावंत शिवसैनिक होते. त्यामुळे त्यांना शिवसेनेने अनेक संधी मिळाल्या होत्या. त्यांना नगरसेवक केलं, आमदार केलं. कोणत्या पद्धतीचा अन्याय केला नाही. तृप्ती सावंत कार्यरत नसताना त्यांना आमदारकी दिली. नारायण राणे यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराला शिवसैनिकांच्या ताकदीमुळे पराभूत करण्यात यश मिळालं, असं विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृप्ती सावंत यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केल्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. शिवसेनेने त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचा अन्याय केलेला नाही. पण त्यांनी आता भाजपसारख्या बेगडी हिंदुत्ववादी पक्षाचा आधार घेतलाआहे. त्यांनी त्या पद्धतीने शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा अवमान केला आहे. त्यांच्या जाण्याने कोणत्याही पक्षावर, मतदारसंघातही परिणाम होणार नाही, असा दावा महाडेश्वरांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button