महेश कोठे राष्ट्रवादीत?, सेनेला ‘जय महाराष्ट्र करत’ राष्ट्रवादीच्या मंत्र्यासोबत पुढच्या प्रवासाला

Sharad Pawar - Mahesh Kothe

सोलापूर : सोलापूरचे शिवसेनेचे (Shiv Sena) मोठे नेते आणि माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kothe) हे राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्याने शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातारण आहे. त्यातच शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत शुक्रवारी (ता. 12 फेब्रुवारी) सकाळपासून सोलापूरच्या दौऱ्यावर होते. तर दुसरीकडे सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे देखील सायंकाळनंतर सोलापूरच्या दौऱ्यावर आले. मात्र महेश कोठे यांनी शिवसेनेचे मंत्री सामंत यांच्या दौऱ्याला जय महाराष्ट्र करत माजी महापौर महेश कोठे यांनी पालकमंत्री भरणे यांच्या गाडीतून प्रवास करत सोलापूर शहरातील कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे महेश कोठे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करण्यावर अप्रत्यक्ष संकेत मिळाले आहे.

शिवसेनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न मध्यंतरी माजी महापौर कोठे यांनी केला. हा प्रयत्न यशस्वी झाला की अपयशी ठरला? या प्रश्नाचे ठोस उत्तर अद्यापही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळालेले नव्हते. मात्र शुक्रवारी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर मात्र महेश कोठे कोणाचे? या प्रश्‍नाचे अप्रत्यक्ष उत्तर सर्वांना मिळाले आहे.

सोलापुरातील सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharne) आल्यानंतर त्यांच्या वाहनात बसून महेश कोठे यांनी प्रवास केला. महेश कोठे यांची पालकमंत्री भरणे यांच्यासोबतची आजची सलगी पाहून आणि पक्षाचे मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याला दांडी मारल्याने कोठे राष्ट्रवादीच्या तंबूत अधिकृतरित्या लवकरच दाखल होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER