कोरोना काळातील वीज बिलांसाठी हप्त्याची सोय

MSEDCL - Electric Bill - Coronavirus

पुणे : कोरोना काळातील वीज बिल हप्त्याने भरण्याची सोय उपलब्ध केली आहे. चालू वीज बिलासाठी ३ हप्त्यांची तर याच कालावधीतील थकीत वीज बिल भरण्यासाठी १२ हप्त्यांची सवलत दिली जाणार आहे. या सवलतीचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने आहे.

महावितरणने (MSEDCL) कोरोना (Corona) काळातील वीज बिल भरण्यासाठी वीजग्राहकांना चालू वीज देयक ३ हप्त्यांत तर थकीत वीज बिल भरण्यासाठी १२ हप्त्याची सवलत दिली आहे. तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांसाठी पुनर्जोडणी करिता वीज देयकाची थकबाकी भरण्यासाठी एकरकमी परतफेड योजना किंवा हप्त्यात वीज देयक भरण्याची विशेष सवलत योजना सुरू केली आहे. थकबाकीवरील ५० टक्के व्याज माफी एकरकमी परतफेड योजनेत तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांना थकबाकीवरील व्याजात ५० टक्के सूट व वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या थकबाकीदार ग्राहकांना एकरकमी परतफेड करता येईल किंवा ५ समान हप्त्यांत वीज देयक भरण्याची विशेष सवलत योजनेचा लाभ घेता येईल.

कालावधीतील डिमांड आकारणी माफ करण्यात येणार आहे. याकरिता ग्राहकांना १०० टक्के मूळ थकबाकी व दंडाच्या रकमेसह थकबाकीवरील व्याजाची ५० टक्के रक्कम भरणा करावी लागेल. या योजनेनुसार ग्राहकांनी मूळ थकबाकी, दंड व व्याजासह असलेली वीज देयक थकबाकीची ३० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित थकबाकी चालू वीज विलासह ५ समान हफ्त्यात भरण्याची मुभा देण्यात येणार आहे. मात्र ग्राहकांना उर्वरित हप्त्याच्या रकमेवर वार्षिक १२ टक्के व्याज आकारणी केली जाईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी नजीकच्या महावितरण कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER