जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा : आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर

Rajendra Patil Yadravkar

कोल्हापूर : सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णांलयांसाठी स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा (Automatic Fire Extinguishing System) बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर (Rajendra Patil (Yadravkar)) यांनी अधिष्ठातांना आज दिली.

राज्यमंत्री यड्रावकर यांनी आज सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरमधील दुर्घटना घडलेल्या कक्षाला भेट देऊन पाहणी केली. यानंतर यड्रावकर यांनी बैठक घेतली. ते म्हणाले, डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, सुरक्षा रक्षक या सर्वांनी लवकरात लवकर चांगल्या पध्दतीने परिस्थिती हाताळल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही, धोका टळला सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करा.

यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. अनिता सैबन्नावर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राहूल बडे, डॉ. बी. वाय. माळी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER