टेस्ला कार निर्माण करणाऱ्या ‘आर्यन मॅननं’ ‘या’ शास्त्रज्ञाकडून घेतली प्रेरणा…

Tesla Car

मागच्या महिन्यात शेअर बाजारात मोठी उलथापालत झाली. तशी ती नेहमी होतच असते, पण यावेळची उलथापालथ संपूर्ण जगाला दखल घ्यायला लावणार होती. बिल गेट्सना बाजूला करत जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब मिळवणाऱ्या अमेझोनच्या जेफ बेझोझला आता हा किताब सोडायला लागला आणि तो मिळवला इलॉन मस्कनं.

खऱ्याखुऱ्या जगातला आर्यन मॅन अशी त्याची याआधी ओळख होतीच. स्पेस एक्स आणि टेस्लाचा सीईओ इलॉन मस्क आता जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. याला कारण ठरलीये टेस्ला कार. टेस्ला कारच मार्केट व्हॅल्यू वाढल्यामुळं त्याला हे शिखर गाठता आलंय. तेही वयाच्या ४९व्या वर्षी. टेस्लाची मार्केट व्हॅल्यू त्याच्याशी स्पर्धा करणाऱ्या टोयोटा, फोर्ड, ह्यूंदाई आणि जनरल मोटर्स या सर्वांची मार्केट व्हॅल्यू एकत्र केली तर टेस्लाची तरी टेस्लाची बरोबरी करणं अवघड आहे.

हे साध्य केलंय टेस्ला कार्सनं. जगातली सर्वात स्मार्ट इलेक्ट्रीक कार. पण या कारला टेस्ला नावं द्यावं असं मस्कला का वाटलं असेल? इलॉन मस्कला जगातला सर्वात श्रीमंत माणूस बनवणाऱ्या या कारच्या नावामागं एका शास्त्रज्ञानाचा त्याग दडलाय. त्यांच नाव होतं निकोला टेस्ला.

विद्यूत क्षेत्रात क्रांती

विचार करा वीज वाहण्यासाठी प्रत्येक अर्ध्या किलोमीटरवर जर ट्रान्सफोर्मर उभारावा लागला असता तर पावर स्टेशनपासून वीज तुमच्या घरापर्यंत पोहचली असती का? साधं, सरळ, सोप्प उत्तर आहे… नाही. थॉमस अल्वा एडीसनने अशाचं करंटचा शोध लावला होता. जो वाहून नेण्यासाठी प्रत्येक अर्ध्या किलोमीटरवर ट्रान्सफोर्मर उभा करावा लागेल.

व्हायचं असं की यामुळं प्रचंड खर्च करायला लागायचा. मर्सेडीज्, बीएमडब्लू आणि ऑडीप्रमाण लाईट त्याकाळी श्रीमंतांच्या, अतिश्रीमंतांच्या सोईचं साधन होतं. यावर उपाय शोधण्याच्या प्रयत्नात जगभरातले शास्त्रज्ञ होते. एडीसनला या शोधामुळं प्रचंड ऐश्वर्य प्राप्त झालं. कमी अंतरासाठी जास्तीचं तंत्रज्ञान वापरावं लागायचं, इतरांच्या गैरसोयीचा एडीसनला मात्र फायदा झाला. त्याच्या या थेट करंट म्हणजे डीसी करंटला टक्कर देवू शकेल, असं कोणतंच संशोधन सुरु नव्हतं. पण एका नावानं त्यावेळी जगभरात खळबळ माजवून दिली. ते नाव म्हणजे निकोला टेस्ला.

दारिद्र्याचे दिवस

नकोला टेस्लाचा जन्म युरोपातल्या क्रोएशियातला, १० जुलै १८५६ चा. त्याचे वडील चर्चमध्ये फादर होते. घरची परिस्थीती गरिब होती. आईला शेती करायला लागायची. आईवडील आणि दोन बहिणी दोन भावांसोबत टेस्लांनी दारिद्र्याचे दिवस पाहिले. वयाच्या आठव्यावर्षी झोकाळ्यवर खेळताना. त्यावरुन पडून मोठ्या भावाला मरताना टेस्लांनी पाहिलं होतं. तेव्हापासून तो अस्थिर झाला. आयुष्यभर टेस्लाला त्याचं मानसिक संतुलन सांभाळता आलं नाही.
पुढं ग्राज विद्यापीठातून टेस्लाने गणित आणि भौतिकशास्त्रात पदवी घेतली. हंगेरीची राजधानी बुडापेस्टला जेव्हा त्यांनी भेट दिली तेव्हा त्यांना टेलिफोन एक्सचेंजमध्ये काम मिळालं. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक पारंपारीक उपकरणात कमालीचे बदल केले होते.

अमेरिकेकडे कूच

काही वर्ष काम केल्यानंतर टेस्ला पॅरीरला गेला आणि तिथं एडीसनच्या कंपनीत कामाला सुरुवात केली. ज्या कंपनीत डीसी करंटच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. काही महिन्यानंतर टेस्ला अमेरिकेला आला आणि तिथंच स्थायिक झाला. १८८४ला टेस्ला मॅनहॅटनमध्ये थॉमस अल्वा एडीसन यांच्या कंपनीत इंजिनिअर म्हणून काम पाहू लागला. एडीसन त्याच्या कामावर खूष होते.

एडीसनने केला अपमान

एडीसन फॅक्टरीवर असताना अत्यंत चिंतीत असल्याचं टेस्लाने पाहिलं त्याबद्दल विचारणा केली तर एका डिझाइनमुळे एडीसन चिंतेत होते. हे डीझाईन सुधारल्यास ५० हजार डॉलर देईल असं एडीसनं सांगून निघून गेले. टेस्लाने हे काम मनावर घेतलं. रोजचे १९ तास त्यांनी स्वतःला कामात झोकून दिलं आणि काही दिवसात ते सुधारेलंल डिझाईन घेऊन एडीसन समोर टेस्ला हजर झाले. त्याने एडीसनकडे ५० हजार डॉलर्स मागितले तेव्हा एडीसन हसून म्हणाला, “बहूतेक तो विनोद होता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही,” टेस्ला प्रचंड नाराज झाला. हा अपमान सहन न झाल्यानं त्याने त्याच क्षणाला ती कंपनी सोडली.

स्वतःची टेस्ला लाइट कंपनी सुरु करण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला. काही दिवसांनंतर त्याच्यावर खाणकामाला जाण्याची वेळ आली. याच काळात त्यांनी अत्यंत सखोल संशोधन केलं, ३० पेटंट मिळवली आणि वेस्टींगहाऊस या उद्योजकाला आकर्षित केलं. तिथून एडीसन विरुद्ध टेस्ला या
करंट वॉरला सुरुवात झाली

एडीसनच्या डीसी करंटला आव्हान देणारा एसी करंटच्या संशोधनाला टेस्लाने सुरुवात झाली. दोघांवर आरोप प्रत्यारोपाच्या फयरी रोज दैनिकातून झडत होत्या. एडीसनने स्वतःचं ऐश्वर्य टिकून रहावं म्हणून सामान्य जनतेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या संशोधनाला अदखलपात्र ठरवलं. एडीसन फक्त शास्त्रज्ञ राहिला नव्हता तर तो एक उद्योगपतीही बनला होता. वीज वाहन्यासाठीच्या पावर प्लांटची कामे त्याच्याकडे होती. अरबो डॉलर्सची गुंतवणूक आणि टेस्ला त्याला आव्हान देत होते. एडीसनपेक्षा हजारोपट स्वस्त दरात वीज वाहून नेणं शक्य आहे, हे सांगत राहिले. शेवटी त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले. करंट वॉरमध्ये टेस्ला जिंकले आणि जगाला मिळाला अल्टर्नेटीव्ह करंट.

आज आपल्या घरापर्यंत स्वस्त दरात वीज येते ती फक्त टेस्लामुळं आणि या वीजेमुळेच आज आपल्याकडच्या टीव्ही, फ्रीज, मोबाईल साऱ्याचं शोधांमागं अप्रत्यक्ष हात टेस्लाचा होता. टेस्लामुळं आपलं आयुष्य सोप्प झालं खरं; पण त्याच्या वाटेला अवहेलना आली.

अशातच ७ जानेवारी १८९१ला त्याच्या खोलीत टेस्लाने वयाच्या ८७व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

अशा उपेक्षित शास्त्रज्ञाकडून इलान मस्कने प्रेरणा घेतली व त्यांचं नाव अजरामर करत टेस्ला कार बनवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER