खासदार इम्तियाज जलील यांनी केली रेल्वेस्टेशनची पाहणी

Imtiaz Jalil

औरंगाबाद : रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवार (ता. १३) सकाळी रेल्वे स्टेशनची पाहणी केली. हजारो नगरीक रेल्वेने दररोज प्रवास करतात, तसेच यात्रेकरूंना कोणकोणत्या अडी-अडचणींना सामोरे जावे लागते त्या संबंधी प्रवास करणाऱ्या यात्रेकरू सोबत खासदार जलील यांंनी चर्चा केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावे जेणे करून यात्रेकरूंचा प्रवास सुखकर होईल.

अशा सूचना यावेळी खा. जलील यंनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. औरंगाबाद रेल्वेस्टेशनला अधिक अद्ययावत करण्यासाठी अजून कोण कोणत्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या याबाबत अधिकाऱ्यांसोबत खा. जलील यंनी चर्चा केली. रेल्वे स्टेशनच्या नवीन प्रवेश द्वाराची उभारणी लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती ही यावेळी खासदार जलिल दिली.

सर्व सार्वजनिक साेयी सुविधा व्यवस्थेची पाहणी

तात्काळ तिकीटासाठी जास्तीचे बुकिंग काउंटर, ट्रेकची व्यवस्था, प्रवाशांना थांबण्यासाठी नवीन जनरल आणि एसी हॉल, शुद्ध पाण्याची नवीन व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांना व आजारी यात्रे करूसाठी व्हील चेरअर ची आणि लिफ्ट ची व्यवस्था तसेच यात्रेकरू साठी सर्व प्रकारच्या सार्वजनिक सुविधांची व्यवस्था आणि स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली, तसेच नवीन बांधकामाचे काही प्रस्ताव असल्यास ते बनवून घ्यावेत, त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांना चर्चेदरम्यान खासदारांनी सांगितले.

रेल्वेने प्रवासासाठी येणाऱ्या यात्रेकरूंना पार्किंगची सुविधा, बस आणि ऑटो रिक्षाची व्यवस्था विषयी लवकरच वाहतूक पोलीस, एस.टी. महामंडळ, महानगर पालिका अधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येईल अशी माहीती जलिल यांनी दिली. रेल्वेस्टेशन पाहणी दरम्यान खासदार इम्तियाज जलील सोबत रेल्वेचे सेशन सुप्रिटेंडन्ट जाखडे , असिस्टंट इंजिनियर विजय कुमार खोबरे, सलीम अहेमद खान, नगरसेवक अबुल हसन हाश्मी आणि रेल्वे विभागाचे इतर अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची उपस्तीथी होती.