स्वच्छ सर्व्हेक्षण रॅकिंगचे महापालिकेला वेध

kolhapur

कोल्हापूर :- स्वच्छ सर्व्हेक्षण २०२० अंतर्गत आपले शहरातील नागरीकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व उत्साह निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. याअंतर्गत शहरातील नागरीकांनीही प्रत्यक्ष सहभागाव्दारे आपल्या शहराला स्वच्छ बनविण्याची मोठी संधी प्राप्त होणार आहे. याव्दारे आपल्या शहरास स्वच्छ सर्व्हेक्षणात अग्रस्थानी आणण्यासाठी व स्वच्छाग्रही बनण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

महानगरपालिका या स्पर्धेमध्ये अव्वळ ठरावी यासाठी स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या रँकिंगमध्ये येण्यासाठी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधीत अधिका-यांची साेमवारी आढावा बैठक घेतली.

या स्पर्धेअंतर्गत शासनाकडून ठरवून दिलेल्या निकषांनुसार ऑन साइट कंपोस्टींग, ओला व सुका कचरा साठवणूकीसाठी दोन डस्टबिन, दैनंदीन कचरा उठाव, दिवसातून दोन वेळा स्वच्छता, शहरात प्रमुख मार्गावर जनजागृती बोर्ड लावणेच्या सूचना आरोग्याधिकारी यांना दिल्या. तसेच सार्वजनीक शौचालय दुरुस्ती करणे व घनकचरा व्यवस्थापनाची कामे तात्काळ पुर्ण करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी दिल्या. सर्व विभाग प्रमुख यांना नेमून दिलेल्या उद्यानामध्ये स्वच्छताबाबत प्रबोधन करणे, रहात असलेल्या परिसरामध्ये जनजागृती करणे, शहरामध्ये ठिकाठिकाणी प्लॅस्टीकबंदी प्रभाविपणे राबविण्याच्या सूचना दिल्या.

महापालिकेतर्फे मातृ वंदना सप्ताह