राष्ट्रवादी पोलीस आयुक्तांच्या, तर शिवसेना गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही?

parambir Singh - Anil deshmukh

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी संशयाच्या जाळ्यात अडकलेले निलंबित साहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला सचिन वाझे यांच्याविरोधात अनेक पुरावे सापडल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच सुरु असलेल्या वाझे यांनी मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्याचा सहभाग असल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आता एनआयएने या बड्या अधिकाऱ्याच्या चौकशीची तयारी सुरु केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह (Parambir Singh) यांना हटविण्याची आग्रही मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. याचा मोठा फटका सरकारच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांचा राजीनामा घेतला जावा, असा पवारांचा आग्रह आहे.

तर दुसरीकडे शिवसेना (Shivsena) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असल्याची माहिती पुढे आली आहे. परमबीर सिंह यांच्याबाबत जो निर्णय घेण्यात येईल तोच निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी असावा. हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख अपयशी ठरले. त्यामुळे त्यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सरकारमधील काही नेत्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER