सुनील माने आणि शिवसेना कनेक्शनची चौकशी करा; एनआयएला पत्र देत भाजपची मागणी

Atul Bhatkhalkar - Sunil Mane - CM Uddhav Thackeray

मुंबई :- मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्याप्रकरणातील आरोपी पोलीस अधिकारी सुनील माने (Sunil Mane) यांच्या शिवसेना (Shiv Sena) कनेक्शनची चौकशी करा, अशी मागणी भाजपचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे. भातखळकर यांनी तसे पत्रच एनआयएच्या (NIA) महासंचालकांना दिले  आहे. त्यामुळे काही दिवसांत  शिवसेनेची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनसुख हिरेन हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेले गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुनील माने यांचे बरेच नातेवाईक हे शिवसेनेत सक्रिय असून त्यांची बहीण व भाऊजी हे तर शिवसेनेचे नगरसेवक होते. तसेच सुनील माने यांचे शिवसेनेच्या नेत्यांशीसुद्धा जवळचे संबंध असल्याने त्यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी करण्याची करण्यात यावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मनसुख हिरेन यांना पोलीस अधिकारी तावडे या नावाने कॉल करून घराबाहेर बोलविल्या प्रकरणी अटक करण्यात आलेले सुनील माने यांचे शिवसेना कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुनील माने यांची बहीण ही मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथून नगरसेविका होती तर त्यांचे पती हे  शिवसेनेकडून चार वेळा नगरसेवक होते. इतकेच नव्हे तर सुनील माने यांचा सख्खा भाऊ व त्यावेळी नगरसेवक असलेले त्याच्या बहिणीचे पती यांनी पत्रा चाळीतील रहिवाशांना धमकवण्यासाठी मानेचा वापर करण्यात आला होता अशी माझी माहिती आहे. पत्रा चाळीतील नागरिकांना घरे रिकामी करण्यासाठी दमदाटी करण्याचा प्रकार केला होता. त्यात सुनील माने यांचासुद्धा सहभाग होता. तसेच पीएमसी बँक घोटाळ्यात ज्या शिवसेना नेत्यांना कर्जे मिळाली त्यांच्याशीसुद्धा सुनील माने यांचा जवळचा संबंध होता. त्यामुळे मनसुख हिरेन हत्याप्रकरणाची चौकशी करताना सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनचीसुद्धा चौकशी होऊन ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होण्याची आवश्यकता असल्यानेच आज एनआयएला पत्र लिहून मी ही मागणी केली असल्याचे आमदार भातखळकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button