रायगड जवळ इनोव्हा-मिनीडोअरला अपघात; ९ जखमी

रायगड : रायगड येथील पालै गावाजवळ इनोव्हा आणि प्रवाशी वाहतूक करणाऱ्या मिनीडोअरला अपघात झाला आहे.
हे दोन्ही वाहन समोरासमोर येऊन धडकल्यानं जवळपास ९ जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

इनोव्हा रत्नागिरीला जात होती तर मिनीडोअर महाडला येत असताना ही दुर्घटना घडली. अपघातातील सर्व जखमींना पोलादपूर मधील आर.एच दवाखान्यात हलवण्यात आले असून सर्व जखमी सुरक्षित आहेत.