भाजपा नेत्यांची निर्दोष मुक्तता : भाजपाचा कोल्हापुरात आनंदोत्सव

BJP

कोल्हापूर : लखनऊ येथे सीबीआय कोर्टात ४९ पैकी हायात असणाऱ्या ३२ आरोपींची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली. या निकाला बद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण केला. भारत माता की जय, जोर से बोलो जय श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आयोध्या तो झाकी है काशी मथुरा बाकी है, वंदे मातरम अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

चिकोडे म्हणाले, गेली ६ वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अजेंड्या मधील कलम ३७०, तिहेरी तलाक, राम मंदिर असे देश हिताचे पूर्ण केले आहेत. आगामी काळात देखील नरेंद्र मोदीयांच्या नेतृत्वाखाली हे सरकार हिंदुत्वाचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावतील असा ठाम विश्वास आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस हेमंत आराध्ये, जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, सरचिटणीस अशोक देसाई आदींची भाषणे झाली. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER