आ. शिवेंद्रराजे यांच्यासह 17 जणांची निर्दोष मुक्तता

शिवेंद्रराजे यांच्यासह 17 जणांची निर्दोष मुक्तता

सातारा : आनेवाडी टोलनाक्यावर नियमबाह्य टोल वसुली विरोधात केलेल्या आंदोलनाच्या गुन्ह्यातून आ. शिवेंद्रराजे  (Shivendra Raje) यांच्यासह 17 जणांची सबळ पुराव्याअभावी वाई न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता केली. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच टोलनाक्यावर आवश्यक सेवासुविधा मिळत नाहीत. तरीही आनेवाडी टोलनाक्यावर टोल वसुली होत असल्याने महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्या विरोधात आ. शिवेंद्रराजे भोसले व त्यांच्या समर्थकांनी दि 18 डिसेंबर 2019 रोजी आंदोलन केले होते.

यावेळी साताऱ्याकडून विरमाडे (ता. वाई) गावाकडे टोलनाक्यावर आ. शिवेंद्रराजे यांच्यासह फिरोज पठाण, जितेंद्र सावंत, मिलिंद कदम, सर्जेराव सावंत, जयश्री गिरी, सरिता इंदलकर, विद्या देवरे, कांचन साळुखे, जितेंद्र कदम, सुहास गिरी, धनंजय जांभळे, नासीर शेख, अशोक मोने, अमोल कदम, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, अमोल मोहिते आणि ऐंशी लोकांनी नाक्यावरील टोल वसुली पाडण्याचा प्रयत्न केला. टोल नाक्यावर बसून विरोधी घोषणा देत निदर्शने केली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केला म्हणून या सर्वांवर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी वाई न्यायालयात सुरू होती. सोमवारी यावर अंतिम सुनावणी घेण्यात आली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन.गिरवलकर यांनी सबळ पुराव्याअभावी आ. शिवेंद्राजेंसह 17 जणांची निर्दोष मुक्तता केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER