तत्कालीन राज्यकर्त्यांमुळेच धनगर समाजावर अन्याय : यशवंत ब्रिगेड

Yashwant Brigade.jpg

कोल्हापूर : तत्कालिन राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे फक्त ‘ड’ आणि ‘र चा जाणिवपूर्वक घोळ घालून धनगर समाजास (Dhangar community) अधिकारापासून वंचित ठेवले आहे. महाराष्ट्रामध्ये ‘धनगड’ ही जमातच अस्तित्वात नाही, तर फक्त धनगर आहेत. यांचे पुरावे देऊनही यापूर्वीच्या सरकारने फक्त वेळकाढूपणा केला आहे. धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही, तर तिव्र आंदोलन करु असा इशारा यशवंत ब्रिगेडचे (Yashwant Brigade) अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष कोळेकर (Santosh Kolekar) यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

डॉ. कोळेकर म्हणाले, महाराष्ट्र सोडून अन्य राज्यांमध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश आहे. अनुसूचित जमातीच्या क्रमांक ३६ मध्ये धनगर समाजाचा उल्लेख आहे. धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या सवलती त्वरीत लागू कराव्यात. राज्यकर्त्यांच्या उदासिनतेमुळे राज्यातील धनगर समाज गेली ७० वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित राहिला आहे. घटनेने दिलेला अधिकार मिळावा, म्हणून महाराष्ट्रातील धनगर बांधव अनेक वर्षे आंदोलन करत आहे. राज्यकर्त्यांच्या उदासिनतेमुळे वेळकाढूपणा होत आहे. धनगर समाजाला राज्य शासनाने न्याय द्यावा, अशी मागणी यशवंत ब्रिगेडच्या सदस्यांनी केली यावेळी ज्ञानदेव पिराई, राणोजी पुजारी, लक्ष्मण पुजारी, शिवाजी पुजारी, भागोजी जामान्ना, धोंडीराम हराळे, कुमार हराळे, प्रकाश पुजारी, प्रकाश सिद, किसन थोरात, विलास अनुसे आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER