भाजपमध्ये चंद्रकात पाटलांवर अन्याय! दादा शिवसेनेत या; ॲाफर कोणाची?

Dilip Lande - Uddhav Thackeray - Chandrakant Patil

पुणे :- विदर्भावर अन्याय होत असल्याचे भाजपचे (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे अधिवेशनात अनेकदा बोलले आहे. याला प्रत्युत्तर शिवसेनेचे (Shivsena) आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांनी दिले. विदर्भावर अन्यायाची भाषा करताना संपूर्ण अधिवेशनात पश्‍चिम महाराष्ट्रातील आमच्या चंद्रकांत दादांना एकदाही बाोलण्याची संधी दिली नाही. हा पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय नाही का? असा प्रश्‍न करत चंद्रकांतदादा (Chandrakant Patil) तुम्ही आमच्याकडे या, असे खुले निमंत्रण आमदार लांडे यांनी विधानसभेत दिला.

अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान, गेल्या आठ दिवसांत विदर्भावरील अन्यायाच्या अनेक गोष्टी मुनगंटीवार यांनी सभागृहात बोलून दाखविल्या. विदर्भावर अन्यायाची भाषा वारंवार करण्यात येत आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांना सभागृहात बोलण्याची संधीदेखील दिली जात नाही. हा तर पश्‍चिम महाराष्ट्रावरील अन्याय आहे. त्यामुळे अशा पक्षात न राहता दादा तुम्ही आमच्याकडे या, असा ऑफर आमदार लांडे यांनी पाटलांना दिला. या निमंत्रणामुळे सभागृहात कुजबुज सुरू झाली.

भाजपच्या धोरणाप्रमाणे सभागृहात चंद्रकांत पाटील फारसे बोलत नाहीत. सभागृहात बोलण्याची मुख्य जबाबदारी ही आमदार मुनगंटीवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशनात विविध मुद्दयावरून हे दोनच नेते बोलत असतात. काल अधिवेशनात फडणवीस यांनी विविध मुद्यांवर सरकारला चांगलेच कोंडीत पकडल्याचे स्पष्ट झाले. पोलीस आधिकारी सचिन वाझे असो वा वीज बिलाचा विषय… फडणवीस यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारने पावले मागे घेतली. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांना बोलण्याची संधी फारशी मिळालीच नाही. पाटील यांच्या या शांत राहण्याच्या भूमिकेचा फायदा घेत शिवसेनेचे आमदार लांडे यांनी मुगंटीवार व भाजपावर निशाना साधला.

ही बातमी पण वाचा : देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील सरसंघचालकांच्या भेटीला, चर्चेला उधाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER