उ. प्र. : एन्काउंटरमध्येही अन्याय ! मारलेल्यांपैकी ३७ टक्के मुस्लिम; ओवेसी यांचा आरोप

asaduddin owaisi

बलरामपूर : उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) भारतीय जनता पार्टीचे (BJP) सरकार आल्यापासून मुसलमानांवर अन्याय वाढले आहेत. २०१७ ते २०२० या कालावधीत राज्यात झालेल्या एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्यांपैकी ३७ टक्के मुसलमान होते. असा आरोप एमआयएमचे (MIM) नेते असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केला.

बिहार आणि पश्चिम बंगालनंतर एमआयएम हळूहळू उत्तरप्रदेशमध्ये शिरकाव करत आहे. एमआयएमने उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. बलरामपूर येथे एका जाहीर जनसभेला संबोधित करताना असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर जोरदार टीका केली.

असदुद्दीन यांच्यावर पलटवार
असदुद्दीन ओवेसी यांनी केलेल्या टीकेवर योगी सरकारमधील मंत्री मोहसिन रजा यांनी पलटवार केला आहे. ओवेसी यांनी मुस्लिम बांधवांना बॅरिस्टर होण्याचा सल्ला द्यावा, गुन्हेगार नाही. गुन्हेगारीमध्ये मुस्लिम बांधवांचा इतका जास्त हिस्सा का असतो, याबाबतही समाजाला मार्गदर्शन करावे, असा टोला रजा यांनी या मुद्यावर बोलताना लगावला. ओवेसी यांचे पूर्वज देशाचे विभाजन करणार आहेत. ओवेसी यांची भूमिका विभाजनवादी आहे, असा आरोपही रजा यांनी केला.

हे तर गुन्हेगारीचे समर्थन – दिनेश शर्मा (Dinesh Sharma)
उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा हे ओवेसी यांच्या आरोपांना उत्तर देताना म्हणालेत, जो जातीय राजकारण करतो, तोच अशी भाषा बोलतो. यातून यांचे गुन्हेगारीला समर्थन आहे, असा अर्थ निघतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER