पर्यावरण विभागाच्या दुर्लक्षामुळेच झाडांची अमानुष कत्तल : प्रवीण दरेकर

Pravin Darekar

मुंबई : वरळी मतदारसंघात पर्यावरणदिनी झालेल्या वृक्षतोडीवरून आता राजकारण रंगताना दिसत आहे. यामुळे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वरळीत झालेल्या या वृक्षतोडीची पाहणी केली. होर्डिंगसाठी झाडे कापली गेली, असा आरोप यावेळी दरेकरांनी केला आहे.

“पर्यावरणमंत्र्यांच्या मतदारसंघात झाडांची कत्तल झाली. हा कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार असून याबाबत कडक कारवाई झाली पाहिजे. मुंबई मनपा व पर्यावरण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच झाडांची अमानुष कत्तल करण्याची हिंमत वृक्षशत्रू दाखवू शकले. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे.” अशी मागणी करताच ”बेंबीच्या देठापासून मेट्रो कारशेडला विरोध करणारे याचं उत्तर देतील का?” असा सवाल दरेकरांनी केला आहे.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात पर्यावरणदिनाच्या पूर्वसंध्येला वृक्षतोड झाली. मुंबई भाजपा अध्यक्ष एम. पी. लोढा यांच्यासह वृक्षतोड झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी दरेकर म्हणाले की, “इथं स्पष्ट दिसत आहे की, होर्डिंग्ज आहेत त्याला ही झाडे अडसर ठरत होती. त्यामुळे झाडे कापण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. मला वाटते यावर कडक कारवाई व्हावी. केवळ दोन दिवस वातावरण संतप्त आहे म्हणून कारवाई करतोय असे दाखवून जमणार नाही. दोन दिवसांत संबंधितांवर गुन्हे दाखल करून, कारवाई झाली पाहिजे.”

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button