नाराजी सचिनवर आणि चाहते वाढले शारापोव्हाचे…हे कसे काय?

Sachin Tendulkar-Maria sharapova

शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात (Farmers Protest) दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) पाॕपस्टार रिहान्नाला (Rihanna) #indiatogether #IndiaAgainstPropaganda या हॕशटॕगखाली दिलेल्या प्रत्युत्तराने चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर नाराजी ओढवून घेतली आहे. आणि या नाराजीचा अप्रत्यक्ष फायदा निवृत्त रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाला (Maria Sharapova) झाला आहे. नाराजी सचिन तेंडूलकरवर आणि फायदा मारिया शारापोव्हाला…हे कसे काय? हे कोणते कनेक्शन आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे तर त्याच्या उत्तरासाठी आपल्याला 2015 पर्यंत मागे जावे लागेल.

2015 मध्ये मारिया शारापोव्हाने एका मुलाखतीत सचिन तेंडूलकर कोण हे आपल्याला माहित नसल्याचे म्हटले होते आणि त्यावेळी भारतीय क्रीडाप्रेमी तिच्यावर जाम भडकले होते. अनेकांनी तिची अक्कल वगैरे काढली होती.बऱ्याच जणांनी तिची Beauty with no brain अशी संभावना केली होती. मात्र आता सचिनच्या एका व्टिटने चित्र बदलले आहे आणि नेटवर सक्रिय असणाऱ्या कितीतरी जणांनी चक्क मारियाला ‘साॕरी’ म्हटले आहे. विशेष म्हणजे शेतकरी आंदोलनात पंजाब, हरियाणा, राजस्थान असे उत्तरेकडील राज्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने असले तरी सचिनवरील नाराजीपोटी शारापोव्हाला ‘सॉरी’ म्हणणारांमध्ये केरळातील नेटकऱ्यांची संख्या अधिक आहे. तिच्या वाॕलवर मल्याळम भाषेत ‘साॕरी’चे भरपूर मेसेज पडले आहेत.

काहींनी तर मारिया शारापोव्हाला थेट केरळ भेटीचे आमंत्रणही दिले आहे. कोरोनाचे (Corona) संकट टळल्यावर थ्रिशूरपूरमला उपस्थिती दे असे आवाहन तिला करण्यात आले आहे.

मारिया शारिपोव्हाला आलेले बहूतेक मेसेजेस हे आधीच्या टीकेसाठी खेद व्यक्त करणारे आहेत. मात्र काहींनी तिला God’s Own Country ला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या संदेशात एकाने मल्याळी भाषेत लिहिलेय की, शारापोव्हा…सचिनबद्दल तू योग्यच होतीस. तु माहिती ठेवावी एवढ्या योग्यतेचा तो माणूस नाहीच.

मारियाने बुधवारी एक व्टिट केले होते. त्यात तिने मे 2019 मधील फ्रेंच ओपन स्पर्धेवेळच्या ड्रेससह मालीबू येथील टेनिस कोर्टवरचा फोटो पोस्ट केला आहे. आणि आणखी कुणाचा वर्षाबाबत गोंधळ होतोय का? असा प्रश्न केला आहे. त्याच्या उत्तरात सचिनवर नाराज चाहत्यांकडून शारापोव्हाला हा अनपेक्षित प्रतिसाद मिळाला आहे.

आता ज्यापर्यंत मल्याळीत शारापोव्हाला संदेश मिळताहेत त्याचप्रमाणे 2015 मध्येसुध्दा तिच्यावर टीकेचे संदेश मल्याळीतच जास्त होते. त्यापैकी बहुतेकांनी शारापोव्हाची वाॕल किंवा हँडलला व्हिजीट करत त्यावेळच्या टीकेसाठी खेद व्यक्त केला आहे. यावेळच्या बहुतांश संदेशांमध्ये म्हटलेय की, ‘मारिया, दी लिजेंड..आम्हाला माफ कर. आम्ही सचिनला एक खेळाडू म्हणून ओळखत होतो. पण एक व्यक्ती म्हणून त्याची आम्हाला माहिती नव्हती. तु योग्यच होतीस म्हणून तुझ्या एफबी पोस्टवर वाईटसाईट लिहिल्याबद्दल माफ कर.’ एकाने तिला आपल्याकडील बिर्यानी आॕफर केली असून ‘आय अॕम द साॕरी’ असा मल्याळी सिनेमाचा डायालाॕग मारला आहे तर एकाने म्हटलेय की, ‘ ताई, ट्रकभर माफी मागतोय. आम्हाला तेवढी दूरदृष्टी नव्हती. काळाने दाखवून दिले की तुच योग्य होतीस.

ही बातमी पण वाचा : किक्रेटचा देव सचिन तेंडूलकर होतोय नेटीझन्सकडून ट्रोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER