
मुंबई : मुंबई आणि पुणे उपनगरीय रेल्वे संदर्भातील माहिती देण्यासाठी एम. इंडिकेटर अँपचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या अँपवर इंग्रजी भाषा असल्याने अनेकांना अँपमधील संपूर्ण माहिती मिळत नव्हती. त्यामुळे या अँपमध्ये मराठी भाषा सुरु करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात एम. इंडिकेटर अँपवर इंग्रजीसह मराठी भाषा येणार आहे.
एम. इंडिकेटर अँपवर लोकल, बेस्ट, एक्सप्रेस, एसटी, मोनो, मेट्रो, रिक्षा कॅब, फेरी, मुंबई स्थानक नकाशा यांची माहिती देतो. यासह रेल्वेची माहिती, मेगाब्लॉकची माहिती, तसेच इतर पर्यायी वाहतुकीची माहिती मिळते. मात्र हि माहिती फक्त इंग्रजीमध्ये असल्याने अनेक प्रवाशांना हे अँप वापरणे अडचणीचे ठरत होते.
त्यामुळे सर्व प्रवाशांपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी हे अँप मराठी करण्यात येत आहे. एम. इंडिकेटर अँपवर सर्व मराठी भाषिक प्रवाशांना रेल्वे आणि इतर पर्यायी वाहनांची माहिती मराठीतून मिळण्याची मागणी मराठीप्रेमी करत होते. एम. इंडिकेटर अँपच्या समाज माध्यमावर मराठीप्रेमी ही मागणी करत होते. यासह अनेकांनी मेलद्वारे एम. इंडिकेटरला संदेश पाठविले होते. तसेच अँपवर मराठी भाषा आणण्यासाठी एम. इंडिकेटरचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे नव्या वर्षात मराठीमय एम. इंडिकेटर अँप दिसेल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला