राज्यातील घडामोडीची माहिती राष्ट्रपतींना द्या, मुनगंटीवारांचे राज्यपालांना आवाहन

Sudhir Mungantiwar - Governor - Maharastra Today

मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Khosyari) यांनी राज्यातील घडामोडींचा अहवाल तात्काळ राष्ट्रपतींना पाठवण्यात यावा, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मुनगंटीवार यांच्या या मागणीमुळे चर्चेला उधाण आले आहे. सुधीर मुनंगटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे.

राज्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्यावर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला, सन्मानाला तडा गेला आहे. या सर्व घटनांचा अहवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून मागवावा व त्याची सत्यता पडताळून तो राष्ट्रपतींकडे तात्काळ पाठवावा, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे.

पोलीस महासंचालक दर्जाच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. या सर्व आरोपांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशामार्फत, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली किंवा सीबीआयमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. परमबीर सिंग यांनी यापूर्वीच वर्षा या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्रिमंडळातील प्रमुख मंडळींना या सर्व प्रकरणा संदर्भात माहिती दिल्याचे पत्रात नमूद केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतल्याचे दिसत नाही. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत शासनाकडून खुलासा प्रसिद्ध कारण्याची तसदीही मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. सिंग यांनी तक्रार केलेल्या संबंधित मंत्र्यावर व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास मुख्यमंत्री असमर्थ ठरले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER