आधीच कोरोना त्यात महागाईचे चटके

inflation with Corona crises

सांगली : कोरोना महामारीच्या (Corona Crises) संकटकाळात खाद्यतेल दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे महागाईच्या (inflation) झळा सर्वसामान्यांना सहन कराव्या लागत आहेत. शेंगदाणा तेल 150 वरून 160 रुपये, सरकी तेल 100 रुपयांवरून 110 रुपये, सूर्यफुल 112 वरून 122 रुपये, सरसो तेल 130 रुपयांवरून 140 रुपये, खोबरेल तेल 230 रुपयांवरून 240 रुपये अशी प्रतिकिलोमागे 10 रुपयांची एकदम वाढ झाली आहे.

ऐन हंगामात भाजीपाल्याच्या दरात वाढ परराज्यांतून भाजीपाल्याची कमी झालेली आवक आणि अवकाळी पावसाचा परिणाम शेती मालावर झाला आहे. यामुळे ऐन हंगामात भाजीपाला दरात वाढ झाली आहे. भाजीपाल्याचे दर गेल्या आठवड्यापासून काही प्रमाणात कमी झाले असले तरी ते अद्यापही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत.

मेथी, पोकळा, पालक, शेपू, कांदापात, कोथींबीर पेंडीचा दर सध्या 10 ते 40 रुपये आहे. काही दिवसांपूर्वी 80 ते 120 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचलेले फळभाज्यांचे दर आता काही प्रमाणात कमी झाले आहेत. सध्या वांगी, गवारी, उसावरची शेंग, दोडका, वरणा व ढबू या फळभाज्यांचे दर प्रतिकिलो सर्वसाधारणपणे 60 रुपये आहेत. टोमॅटो 30 ते 40 रुपये किलो, फ्लॉवर 20 ते 30 रुपये, कोबी 10 ते 20, मुळा 10 रुपये, शेवगा 10 रुपये नग आहे. काकडीचा दर 40 रुपये प्रतिकिलो आहे. गेली सहा महिने कोरोना संसर्गाने हतबल झालेल्या सर्वसामान्यांना आता महागाईचे चटके सहन करावे लागत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER