महागाईचा दणका : महागाई दर १०.४९ टक्क्यांवर

Inflation

दिल्ली : कोरोनामुळे (Corona Vieus) महागाई (Inflation) वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून घाऊक किंमतीची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील महागाई दर चटके देणारा आहे. डाळी, फळ आणि अंडी-मांस यांच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. गहू, तांदूळ, भाज्या, कांदे-बटाटे यांच्या किंमतीत मात्र घट झाल्याचे दिसते.

मार्च महिन्यात महागाई दर हहा ७.३९ टक्के होता तो एप्रिलमध्ये हा १०.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाई दरात एका महिन्यात जवळपास ३.१ टक्क्यांची वाढ झाली. तेल आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढल्याने हा महागाई दर वाढल्याचे सांगण्यात येते आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांची आकडेवारी प्रकाशित केली आहे. फेब्रुवारीत महागाई दर ४.८३ टक्के होता. मार्च महिन्यात २.५६ टक्क्यांनी वाढला आणि ७.३९ टक्क्यांवर पोहोचला. तर मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये ३.१ टक्क्यांनी वाढला असून १०.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button