महाविकास आघाडीत स्थानिक नेत्यांची घुसमट ! शिवसेनेकडून कॉंग्रेसचा पालकमंत्री बदलण्याची मागणी

Hemant Patil

हिंगोली : भाजपला (BJP) सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP) आणि कॉंग्रेसने (Congress) एकत्र येत सरकार स्थापन केले मात्र, सरकारच्या स्थापनेपासूनच या तीन पक्षांतील मतभेद अनेकदा जाहीरपणे समोर आले आहेत.

त्यातच राज्य पातळीवर तिन्ही पक्ष एकमेकांना सांभाळून घेत असले तरी स्थानिक नेत्यांची महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये घुसमट होतेय का असे चित्र आहे. स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये कुजबुज, वादविवाद आहेत ते अनेकदा जाहीरपमे समोर आले आहेत. शिवसेना राष्ट्रवादीमधीलही स्थानिक पातळीवरील नेत्यांमधील वाद लपलेले नाहीत. म्हणूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्थानिकांनी शिवसेनेशी जुळवून घ्यावे असे सांगावे लागले. आता शिवसेना कॉंग्रेसमधील जाहीर नाराजी समोर आली आहे.

हिंगोलीचे शिवसेना (Shiv Sena) खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी हिंगोली जिल्ह्याचा काँग्रेसचा पालकमंत्री बदलावा अशी मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नांदेड किंवा हिंगोलीचा पालकमंत्री बदलावा, अशी मागणी केली होती.

काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसच्या पालिकांना निधी मिळत नसल्याच परभणीत म्हटलं होतं. त्यानंतरच या सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याच पुढं आलं होतं. यानंतर मी अस म्हटलोच नाही,माझ्या वाक्याचा माध्यमांनी अपभ्रंश केला, असं म्हणत अशोक चव्हाणांनी सारवा सारव केली होती.

सरकारची वर्षपूर्ती अनं शिवसेना खासदारांची नाराजी

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण होऊन एक महिना होत आलाय. हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना काम होत नसल्याचा जाहीर आरोप केला आहे. नांदेडला अशोक चव्हाण (Ashok Chavan) तर हिंगोली वर्षा गायकवाड पालकमंत्री आहेत. हे दोन्ही पालकमंत्री काँग्रेसचे असल्यानं दोन्ही पालकमंत्र्यांकडून शिवसेनेची कामे होत नसल्याचा थेट आरोप खासदार हेमंत पाटील यांनी केलाय. यामुळं महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आलीय. हिंगोली किंवा नांदेडचा पालकमंत्री बदला, अशी मागणी हेमंत पाटील यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या समोरच केली.

हेमंत पाटलांचे आरोप काँग्रेसने फेटाळले

हिंगोली काँग्रेस कमिटीने मात्र हेमंत पाटलांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वर्षा गायकवाड या सर्वांना सोबत घेऊन विकासकामं करत आहेत,अस काँग्रेसचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी म्हटलं आहे.

बुडत्या काळात सत्ता आल्याने सगळ्यांनाच आपल्या हाताला काही तरी लागलं पाहिजे असं वाटतंय. जीसकी भैस उसकी लाठी अशा पद्धतीच राजकारण सुरू असल्याने महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल नसल्याचं समोर येत आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र बसून हे छोटे मोठे वाद सोडवण्याची गरज निर्माण झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER