
पालघर : पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. दुकाने आणि पोल्ट्रीफार्म २१ दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाप्रशासनाने दिले आहेत. १ किलोमीटर परिसरातील चिकन विक्री दुकानांवरील कोंबड्या, अंडी, खाजगी पक्षी तसेच पशुखाद्यची विल्हेवाट लावणे, असेही आदेश देण्यात आले आहेत.
पालघरमधील सूर्या कॉलनीत सरकारी पोल्ट्रीफार्ममध्ये ४५ कोंबड्यांचा मृत्यू झाला. या सर्वांचे अहवाल पॉसिटीव्ह आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सिद्ध झाले. या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याची माहिती जिल्हाप्रशासनाने दिली. यामध्ये बर्ड फ्लू आढळल्यानंतर सरकारी पोल्ट्रीमधील ५०० हून अधिक कोंबड्या आणि अंडी तसेच पशुखाद्य याची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी सांगितले.
तसेच, जिल्ह्यात स्थापन केलेल्या शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत इतर कुकूटपालन केंद्रांमध्ये व चिकन विक्री दुकानांमध्ये तपासणी करून खबरदारीच्या सूचना पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला