सहकाऱ्याचे अंत्यदर्शन घेतांना फुटला इंदुरीकर महाराजांच्या अश्रूंचा बांध

Shrihari Shelke-Indurikar Maharaj

अहमदनगर : कीर्तनातून जनतेला हसवून अंतमुर्ख करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांना सहकाऱ्याचे अंत्यदर्शन घेतांना अश्रू अनावर झालेत.

इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनात मृदंग वाजवणारे ठाणगाव येथील मृदंगाचार्य श्रीहरी रमेश शेळके यांचे अवघ्या ३० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. श्रीहरी शेळके (Shrihari Shelke) यांच्या निधनामुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

श्रीहरी रमेश शेळके यांचे अंत्यदर्शन घेताना इंदुरीकर महाराजांना अश्रू आवरले नाही. ढसाढसा रडत त्यांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली. १२ वर्ष ते इंदुरीकर महाराज यांच्यासोबत होते. इंदुरीकर महाराज महाराष्ट्रात जेथे कुठे किर्तनाचा सोहळा घेणार त्याठिकाणी श्रीहरी शेळके कायम त्यांच्या सोबतच असायचे. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER