पुरोगामी संघटनांच्या विरोधामुळे इंदोरीकरांचा कोल्हापुरातील कार्यक्रम रद्द

Indurikar Maharaj

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांच्या शिव महोत्सवाला निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन आज शुक्रवारी सायंकाळी शिवाजी विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास पुरोगामी संघटनांनी विरोध दर्शवला होता. तसेच इंदुरीकर महाराज यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही असा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर केले आहे.

इंदोरीकर महाराज यांच्या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच जिल्ह्यातील अन्य पुरोगामी संस्थांनी विरोध दर्शवला होता. इंदोरीकर यांना अहमदनगरवरून येण्यास वेळ लागणार असल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे स्पष्टीकरण आयोजकांनी दिले आहे.

आज इंदोरीकर महाराज कोल्हापुरात : शिवाजी विद्यापीठात तणाव