इंदू की जवानी’चा पहिला गाणं रिलीज होताच झाला वायरल, यूट्यूब वर कियारा अडवाणीचा जलवा

Kiara Advani

कियारा अडवाणीच्या (Kiara Advani) ‘इंदू की जवानी’ (Indu Ki Jawani) या चित्रपटाचे हे गाणे ‘सावन में लग गई आग’ या प्रसिद्ध गाण्याचे रिमेक आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या बहुप्रतिक्षित फिल्म ‘इंदू की जवानी’ चे पहिले गाणे रिलीज झाले आहे. रिलीज होताच हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. ‘हसीना पागल दिवानी’ असे या गाण्याचे नाव आहे. कियारा अडवाणी यांच्या चित्रपटाचे हे गाणे ‘सावन में लगे गई आग’ या प्रसिद्ध गाण्याचे रिमेक आहे. या गाण्याला गायक मीका सिंहने आवाज दिला आहे.

१ करोडपेक्षा अधिक Views

या गाण्याचे व्हिडिओला आतापर्यंत ११,८६२,२२१ वेळा पाहिले गेले आहेत. ‘इंदू की जवानी’ या विनोदी चित्रपटापासून बंगाली लेखक-चित्रपट निर्माता अबीर सेनगुप्ता हिंदी चित्रपटविश्वात दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत. यात आदित्य सील आणि मल्लिका दुआ देखील आहेत. सांगण्यात येते की, ‘कबीर सिंह’ चित्रपटा नंतर कियाराचे तारे सध्या जोरात आहेत. या चित्रपटानंतर कियाराला सातत्याने चांगले चित्रपट मिळत आहेत.

अक्षरा कुमारच्या ‘गुड न्यूज’ या चित्रपटात कियारा शेवटच्या वेळी दिसली होती, यामध्ये करीना कपूर आणि दिलजीत दोसांझही महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. ‘इंदू की जवानी’ शिवाय कियारा या दिवसात ‘लक्ष्मी बॉम्ब’ आणि ‘भूल भुलैया २’ मध्ये दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER