इंदोरीकर महाराजांना कोर्टाचा मोठा दिलासा, ‘तो’ खटलाच रद्द

court order - Indorika Maharaj - Maharastra Today

अहमदनगर : सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. आता इंदोरीकर महाराजांना कोर्टाने मोठा दिलासा देत खटला रद्द करण्याचा आदेश दिला आहे. संगमनेर जिल्हा सत्र कोर्टाने इंदोरीकर महाराज यांच्या बाजूनं निकाल दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पेढे वाटून एकच जल्लोष केला.

स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते, असं वादग्रस्त विधान महाराज इंदोरीकर यांनी केले होते. लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button