इंडोनेशियाचे विमान उड्डाणानंतर चार मिनिटांत बेपत्ता; समुद्रात कोसळल्याची भीती

The Sriwijaya Air Boeing 737

जकार्ता :इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण केल्यानंतर श्रीविजय एअरचे प्रवासी विमान बेपत्ता झाले आहे. या बोइंग-७३७ विमानात ६२ प्रवासी आहेत. उड्डाणानंतर काही मिनिटांत या विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. ते समुद्रात कोसळल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. जावाच्या समुद्राचे अंतर पार करायला सरासरी ९० मिनिटे लागतात. फ्लाइट रडार २४ च्या डाटानुसार विमान २५० फूट खाली येण्याआधी ११ हजार फूट उंच गेले होते.

जकार्तावरून उड्डाण केल्यानंतर श्रीविजय एअरचे हे विमान अवघ्या चार मिनिटांत १० हजार फूट उंचीपर्यंत पोहचले होते आणि अवघ्या एका मिनिटात ते १० हजार फुटांपेक्षा जास्त खाली आले अशी माहिती फ्लाइट रडार २४ च्या ट्विटर अकाउंटने दिली. दरम्यान, जकार्ताच्या किनाऱ्याजवळ ढिगारा दिसला आहे, अशी माहिती स्थानिक मच्छीमारांनी दिल्याचे वृत्त कोमपास टीव्हीने दिले आहे. पण, तो ढिगारा बेपत्ता विमानाचा आहे का? हे अजून स्पष्ट झालेले नाही. इंडोनेशियाचे बचाव पथक विमानाचा शोध घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER