इंदिरा चुकल्या : मोदी आता तुम्ही स्टॅलिन होवू नका : राजू शेट्टी

Raju Shetty

कोल्हापूर : हरियाणा, पंजाब, उत्तरांचल, उत्तरप्रदेश अशा दिल्लीच्या वेशीवर महामार्ग रोखून बसलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटलो. शेतकरी मागण्यांवर ठाम असून देशभरातून मोठा पाठींबा आहे. सरकारने माघार घ्यावी, शेतकऱ्यांपुढे झुकणे म्हणजे पराभव नव्हे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेल्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधील शेतकरी रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर खलिस्तानवादी चळवळ वाढून पुढील दहा-बारावर्षे पंजाब पेटला. स्टॅलिनने एकेकाळी आंदोलक शेतकऱ्यांना चिरडले होते. स्टॅलिनचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखले. मोदी साहेब, तुम्ही स्टॅलीन होवू नका. चार पावले मागे या. कायदे रद्द करा, असे आवाहन असे अवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले.

शेट्टी म्हणाले, दिल्लीच्या वेशीवर गेली वीस दिवस आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा संयम आता सुटत चालला आहे. ४० वर्षापूर्वी काँग्रेसच्या राजवटीत असाच प्रसंग आला तेव्हा सरकार ताठर राहिल्याने खलिस्तान चळवळीला बळ मिळाले. आता तशीच स्थिती येण्याची वेळ केंद्र सरकारने पाहू नये. परिस्थती हाताभार जात आहे, म्हणूनच केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत. केंद्र शासनाने खंदक खोदून रस्ते रोखल्यानेच दोन दिवस होणारे आंदोलन वीस दिवसांहून चालले. आजपर्यंत १४ आंदोलक शेतकऱ्यांचा बळी गेला. आंदोलकांवर बळाचा वापर झाल्यास याचे पडसाद देशभर उमठतील. अण्णा हजारे यांच्या आंदोलनास ज्याप्रमाणे भाजपने पाठींबा दिला, तीच भूमीका आता विरोधी पक्ष निभावत आहे. सामाजिक प्रश्नांतील लढ्याला विरोधी पक्षाने पाठींबा द्यायचा असतो, ते त्याचे काम असते. सरकार फसत चालल्यानेच त्यांचे प्रतिनिधी आंदोलक शेतकऱ्यांवर नाहक आरोप करत आहेत.

भाजपने कोणाला प्रदेशाध्यक्ष करावे हा त्यांचा प्रश्न आहे.मात्र, आ. चंद्रकांत पाटील यांनी कसलीही वटवट केली तरी आम्ही ऐकूण घेवू असे होणार नाही, असे सांगून शेट्टी म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे भ्रष्टाचाराचे पुरावे असतील तर ते द्यावेत. कोणी जर भ्रष्टाचार केला असेल तर त्यांनी तो बाहेर काढावा. पण गाडीभर पुरावे दाखवायचे आणि गाडीच गायब करायची असे नको.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER