इंदिरा गांधींनी केली होती सावरकरांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीची प्रशंसा

स्वामींनी ट्वीट केले पत्र

Subramanian Swamy

दिल्ली : देशाच्या माजी पंतप्रधानं इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त इंदिरा गांधी यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना अभिवादन केलं जात आहे. याच निमित्तानं भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक पत्र ट्विट केलं आहे. या पत्राचा हवाला देत स्वामी यांनी सवाल उपस्थित केले आहेत.

नेहमी आपल्या खळबळजनक विधानांमुळे चर्चेत राहणारे भाजपाचे (BJP) खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) यांनी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी एक ट्विट करत शेअर केले आहे. हे पत्र इंदिरा गांधी यांनी पतप्रधान असताना लिहिले होते. या पत्राचा हवाला देत स्वामी यांनी काँग्रेसवर टीका केली.

“इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना हे काय लिहिले आहे? याचे टीडीकेकडे (काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून केलेला शब्दप्रयोग) उत्तर आहे का?”, असा प्रश्न स्वामी यांनी उपस्थित केला आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी शेअर केलेले पत्र २० मे १९८० चे आहे. या पत्रात म्हटलेलं आहे की, “मला ८ मे १९८० रोजी आपले पत्र मिळाले. ब्रिटिश सरकारविरुद्ध वीर सावरकर यांनी दाखवलेल्या धाडसाचं भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात वेगले महत्त्व आहे. भारताच्या या असामान्य पुत्राची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहात होण्यासाठी सदिच्छा व्यक्त करते,” असं पत्रात म्हटलेलं आहे. या पत्रावर सुरुवातीलाच भारताचे पंतप्रधान असा उल्लेख आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की आजचे काँग्रेसचे नेते सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान आहे हे मान्य करायला तयार नाहीत. एवढेच नाही तर त्यांना हिणवत असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER