इंदिरा गांधींनी इतिहास नाही, तर जगाचा भूगोल बदलला- शरद पवार

Indira Gandhi did not have history, the world's geography changed- Sharad Pawar

नांदेड : इंदिरा गांधींनी इतिहास नाही बदलला. त्यांनी जगाचा भूगोल बदलला, असं शरद पवार म्हणाले आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भानं ते बोलत होते. नोटाबंदीनं गरिबांचं जीवन उद्ध्वस्त केलं, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा:- शिवसेनेच्या विरोधात पाच ठिकाणी नारायण राणेंचे उमेदवार

ते नांदेड येथील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षांच्या महाआघाडीच्या संयुक्त प्रचारसभेत बोलत होते. जीएसटीनं व्यापाऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं आहे, असंदेखील शरद पवार म्हणाले आहेत. दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीला नरेंद्र मोदी गैरहजर राहिल्यावरून शरद पवार यांनी मोदींवर टीका केली आहे.

महाराष्ट्रात निवडणूक प्रचाराचा ढोल वाजायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीनं नांदेडमधून लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुकलं आहे. नांदेडमधील आघाडीच्या प्रचारसभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसह दिग्गज नेते हजर होते. आघाडी झाल्यानंतरची दोन्ही पक्षांची ही पहिलीच संयुक्त सभा होती. सेना-भाजपची युती झाल्यानं आता आघाडी आणि युती असा थेट सामना रंगणार आहे. निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झालेली असून सत्ताधारी विरोधकांमध्ये मतांसाठीचा सामना यंदा चांगलाच गाजणार असे दिसते.